शरद पवारांनी केला गृहमंत्र्यांना फोन,म्हणाले.. माझी सुरक्षा कमी करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत कपात केल्यानंतर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून आपली सुरक्षा कमी करण्याची मागणी केली आहे.याची माहिती खुद्द गृहमंत्री देशमुख यांनी दिली.

राज्य सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप आमदार प्रसाद लाड,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत घट केली असून,फडणवीस यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ वाहन देखील काढण्यात आले आहे.तीन दिवसांपूर्वी सुरक्षा आढावा समितीची बैठक झाली.या समितीने काही जणांची सुरक्षा कमी केली तर काही जणांची वाढवली आहे.भाजपच्या नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन ‘माझी सुरक्षा कमी करा.मी स्वतः माझी सुरक्षा कमी करण्यास तयार आहे. शिवाय मला देण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या.’ असेही पवारांनी देशमुख यांना सांगितले आहे.या समितीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात निर्णय घेतला आहे.

Previous articleसरकारचा दणका:भाजप नेत्यांची सुरक्षा केली कमी;फडणवीसांची बुलेटप्रुफ गाडी काढली
Next articleअंगरक्षकाच्या आईचे अपघाती निधन ; पंकजाताई मुंडे हळहळल्या !