भराडीदेवीची यात्रा रद्द ; यात्रेला भाविकांनी न येण्याचे आवाहन

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोकणासह राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या भराडीदेवीची यंदा होणारी जत्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली असून,या यात्रेला भाविकांनी न येण्याचे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

आज मंत्रालयात अंगणेवाडीतील भराडीदेवी मंदिराचे विश्वस्त आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यात यात्रेच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत विश्वस्त मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ६ मार्च रोजी होणारी भराडीदेवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.या यात्रेला साधारणत: ७ स ते ८ लाख भाविक दर्शनासाठी येतात.राज्यातील कोरोनाची परिस्थिती निवळली असली तरी धोका कायम असल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याने अंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रेला भाविकांना न येण्याचे आवाहन सामंत यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ च्या धर्तीवर ‘माझी जत्रा माझी जबाबदारी’ असे अभियान जत्रेत राबवणार असल्याचेही सांमत यांनी सांगितले.कोकणातील जनतेचे श्रध्दास्थान असलेल्या भराडीदेवी यात्रा भाविकांसाठी रद्द केली असली तरीही धार्मिक कार्यक्रम दोन दिवस सुरू राहणार आहेत.यंदा आंगणेवाडीची जत्रा साध्या पद्धतीने साजरी केला जाणार आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात तारीख जाहीर केली होती,तेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा होता.त्यामुळे जत्रा रद्द करण्यात आली होती. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने यंदाची यात्री ही आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आंगणेवाडी विकास मंडळाचे विश्वस्त भास्कर आंगणे यांनी दिली आहे.

Previous articleसंतापजनक ! कुठे गेला मराठीबाणा ? कुठे गेला महाराष्ट्रधर्म ? भारतरत्नांची चौकशी
Next articleविधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होते आणि काँग्रेसकडेच राहिल : नाना पटोले