विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी “या” आमदारावर कारवाईची केली मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला असतानाच आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीतील आणखी एका आमदाराचा पर्दाफाश केला आहे.राज नावाच्या एका मुलाने माझ्या वडिलांची डीएनए टेस्ट करावी,अशी याचिका न्यायालयात केली आहे.हा प्रकार कायदा सुव्यवस्थेला शोभणारा नसून तो लज्जास्पद आहे,असे सांगत दरेकरांनी विधानपरिषदेत सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे.महाविकास आघाडीच्या एका आमदाराच्या डीएनए टेस्ट करण्याची मागणी आज विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात केली.या प्रकरणा विषयी दरेकर यांनी सांगितले की,आघाडीच्या एका आमदाराच्या डीएनए टेस्टचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. या आमदाराची पत्नी आणि अपत्य बाहेर आहेत.न्यायालयात याचिका सुरू असताना तो मुलगा अचानक गायब झाला. त्यानंतर शोध घेतल्यावर कळले की सुरत येथील सागर नावाच्या लोकप्रतिनिधीच्या मित्राकडे नेण्यात आले होते.या मुलाला मारहाणही केली असून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.त्या मुलाच्या आईने तक्रार केली परंतु ती तक्रार घेण्यात आलेली नाही. त्या मुलाच्या डोक्यावर परिणाम झाला,व्यसनाधीन झाला असे आरोप करण्यात आले. सत्तेच्या जोरावर आज त्या आमदार विषयी कारवाई नाही,न्यायालयात विषय प्रलंबित आहे. या आमदारावर कारवाई झाली पाहिजे तसेच त्या महिलेला व त्या मुलाला संरक्षण द्यावे,अशी मागणी दरेकर यांनी केली.

Previous articleराष्ट्रवादीने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे ; प्रवीण दरेकरांची मागणी
Next articleमहिलांच्या बाबतीत सरकार असंवेदनशील;भाजपच्या नेत्याने राज्यात राष्ट्रपती राजवटीची केली मागणी