दुपारी चालणारे सरकार आता सकाळी नऊ वाजता चालते : दरेकरांची टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई । दुपारी चालणारे सरकार आता सकाळी नऊ वाजता चालते, राज्यातील जनतेच्या हितासाठी चालत आहे की, वाझे प्रकरणांमध्ये स्वतःची अडचणींमधून सोडवणूक करण्यासाठी चालत आहे,अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर केली आहे.

वाझे प्रकरणांमध्ये अनेक बैठका होत असल्याचे दिसून येत आहे त्यावर दरेकर म्हणाले, आदरणीय पवार साहेबांपासून ते दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांपर्यंत बैठकांचा सिलसिला सुरू आहे, निश्चितपणे या प्रकरणाचे धागेदोरे उच्च पोलिस अधिकाऱ्यांसहित इतर राजकीय नेत्यांसोबत पोहोचतात की काय आणि त्याच चिंतेमुळे या बैठका होत आहेत का ? अशा प्रकारचे प्रश्न जनतेसमोर उभं राहत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.सचिन वाझे प्रकरणामुळे अनिल देशमुख यांची उचलबांगडी होत असताना यामध्ये इतर कोणी उच्च अधिकारी आहे, तसेच राजकीय वरदहस्त कोणाचा आहे? असा सवाल करताना दरेकर यांनी केला तसेच या गोष्टी सुद्धा पुढे येण्याची आवश्यकता आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे सरकारची जबाबदारी आहे त्यामुळे त्यांनी स्वतः खात्याचा प्रमुख म्हणून राजीनामा द्यावा असे दरेकर यांनी सांगितले.

दरेकर म्हणाले की, पूजा हत्या प्रकरणात २० दिवस एफआयआरला लागले त्यानंतर २ दिवस मुख्यमंत्र्यांनी राजीनामा खिशात ठेवला तोपर्यंत सर्व पुरावे नष्ट झाले, तसेच या प्रकरणात नंबर प्लेट बघितल्या गेल्या, डिजिटल शूटिंग काढण्यात आल्या आहे, तसेच सचिन वाझे राहत असलेल्या साकेत सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज गायब केल्याचा संशय एनआयने केला आहे, परंतु पोलिसांच्या रेकॉर्डवर काहीचनाही याचा अर्थ तुम्ही ते सगळे कागद घेतले आणि नष्ट केले का? असा सवाल दरेकर यांनी केला.सरकार कारवाई उशिरा करत असल्याचे दरेकर यांनी सांगितले. दस्तावेज, पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार गुन्हेगाराना वेळ तर देत नाही ना? अशा प्रकारची भूमिका सरकार घेत असल्याचे संजय राठोड प्रकारनावरून दिसून आले. या सर्व बाबीतून हे प्रकरण पूर्वनियोजित असल्याचा मोठा कट असावा अशा प्रकारचे चित्र प्रथमदर्शनी दिसून येते अशा प्रकारची टीका दरेकर यांनी केली.

Previous articleमहाविकास आघाडी सरकारवर कसलाही परिणाम नाही : शरद पवार
Next articleसरकारचा मोठा निर्णय : हेमंत नगराळे नवे पोलीस आयुक्त,पोलीस दलात मोठे फेरबदल