राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न,अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर उद्या निर्णय

मुंबई नगरी टीम

नवी दिल्ली । वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेंना पोलीस सेवेत पुन्हा घेण्याचा निर्णय हा तत्कालिन मुंबई पोलीस परमबीर सिंग यांचाच होता असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेल्यावर परमबीर सिंग यांचे पत्र आले,असाही दावा शरद पवार यांनी करून राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी काल मुख्यमंत्री ठाकरे पत्र लिहिल्यानंतर त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत.भाजपचे खासदार नारायण राणे,मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना राज्य सरकारवर टीकास्त्र सोडून गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपने राज्यभर आंदोलन केले.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेवून,राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे, मात्र यामध्ये यश येणार नाही असे सांगतानाच,सचिन वाझेंना पोलीस सेवेत पुन्हा घेण्याचा निर्णय हा तत्कालिन मुंबई पोलीस परमबीर सिंग यांचाच होता असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचे दोन भाग आहेत.त्यापैकी एक मोहन डेलकर प्रकरणावर आहे तर दुसरा भाग वाझे प्रकरणावर आहे.डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती.असा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आला आहे. असे पवार म्हणाले.परमबीर सिंग यांनी मला व मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात गृहमंत्र्यांनी दर महिन्याला १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप करण्यात आला आहे,मात्र पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद करण्यात आलेले नाही असे स्पष्ट करतानाच, देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर परमबीर सिंग पत्र आले असेही पवार यांनी सांगितले.राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे.पत्रकार परिषदेपूर्वी माझी मुख्यमंत्री ठाकरेंशी चर्चा झाली आहे असे सांगून,अनिल देशमुखांबद्दल उद्यापर्यंत निर्णय घेऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले.हे प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत असल्याने यांची अधिकाऱ्यामार्फत चौकशी व्हावी अशी मागणीही पवार यांनी केली.

Previous articleगृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे
Next articleगृहमंत्र्यांना अडचणीत आणणा-या ‘त्या’ पत्राबाबत परमबीर सिंह यांनी केला मोठा दावा