“ए भाई, तु कोण असशील” !..अमृता फडणवीसांनी भरला मुंबई काँग्रेस अध्यक्षांना दम

मुंबई नगरी टीम

मुंबई । वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणी विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारच्या विरोधात रान उठवलं असून,त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असतानाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असतानाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करीत भाई जगताप यांना चांगलाच दम भरला आहे.आज दिवसभर अमृता फडणवीस यांच्या या ट्विटचीच चर्चा आहे.

वाझे प्रकरणी विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.यावर प्रतिक्रिया देताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की,देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना त्यांनी पोलीसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली ? याचे उत्तर त्यांनी द्यावं.फडणवीस यांनी तब्बल २१ जणांना त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे त्यांच्या बाबत काय बोलणार असेही देखील भाई जगताप म्हणाले होते.भाजपने परमबीर सिंग यांच्या माध्यमातून लेटर बॉम्ब टाकून झाला.याबाबत मोठ्या प्रमाणात बोंबा बोंब करून देखील झाली.परंतु, त्यांचे सर्व पर्याय निष्क्रिय होत असल्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत ते मागणी करत आहेत. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ व्यवस्थितरित्या पूर्ण करेल असा दावा जगताप यांनी केला होता.

देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना त्यांनी पोलीसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली ? याचे उत्तर त्यांनी द्यावं हा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना चांगलाच झोंबला असल्याचे स्पष्ट होते.अमृता फडणवीस यांनी आज एक ट्विट करून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘ए भाई , तू जो कोण असशील’ – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती ! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय ! अशा शब्दात त्यांनी भाई जगताप यांनी सरळसरळ दम भरला आहे.नेहमी समाज माध्यमांत सक्रिय असणा-या अमृता फडणवीस यांनी जगताप यांना दिलेल्या इशा-यामुळे अमृता फडणवीस यांचे ट्विट चर्चेत आहे.

Previous articleरूग्ण संख्येत वाढ होत राहिल्यास लॉकडाऊन ? दोन दिवसात निर्णय घेणार
Next articleपोलिस दलातील बदल्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करा