रूग्ण संख्येत वाढ होत राहिल्यास लॉकडाऊन ? दोन दिवसात निर्णय घेणार

मुंबई नगरी टीम

पुणे । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून,राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये दररोज कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे.अशावेळी रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत राहिली तर काही शहरात लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागेल असे सांगून,याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य लॉकडाऊनच्या दिशेने चालले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.नागपूर,पुणे,मुंबई, औरंगाबाद,नाशिक आदी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत आहे.अशावेळी रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत राहिली तर काही शहरात लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागेल.याबाबतमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चिंता वाढत आहे.उद्या याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होणार असून,यासाठी काही दिवस दिले जातील असे सांगतानाच, लगेच उद्या लॉडकडाऊन जाहीर होणार नाही, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.त्यामुळे लॉकडाऊन टाळायचे असेल तर जनतेने नियम पाळायला हवे,असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.पुढील दोन चार दिवस कोरोना रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे.त्यानंतर हे प्रमाण कमी होईल,असा अंदाज असल्याचे टोपे यांनी सांगितले.

मुंबई, पुणे नागपुर शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशावेळी केंद्राने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करुन सर्व गोष्टी केल्या जात आहेत. पुण्यात रोज ३ लाख चाचण्या केल्या जात आहेत.मोठ्या शहरात पुरेशे बेड उपलब्ध आहेत.सध्या कोरोना रूग्णांची संख्या ज्या गतीने वाढत आहे, त्या दृष्टीने अजून तयारी करावी लागेल. जम्बो सेंटर पुन्हा एकदा सुरु करावे लागतील. जिथे डॉक्टर, नर्स यांच्या जागा रिक्त आहेत. त्या भरण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती टोपे यांनी दिली.ग्रामीण भागात लसीकर अधिक वेगाने करण्याची गरज असल्याने गावागावातील आरोग्य उपकेंद्रातही लसीची सोय करण्याचा विचार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. तसेच ज्या खासगी रुग्णालयांमध्ये २० बेडची सुविधा आहे, अशा रुग्णालयांमध्येही लसीकरणाची परवानगी दिली जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत कुठलीही लपवाछपवी होत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleगृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही; शरद पवारांचा मोठा निर्णय
Next article“ए भाई, तु कोण असशील” !..अमृता फडणवीसांनी भरला मुंबई काँग्रेस अध्यक्षांना दम