शरद पवारांची प्रकृत्ती स्थिर; ब्रीच कँडीत बुधवारी शस्त्रक्रिया करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पवार यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले आहे.परवा बुधवारी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल,अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले .डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे सांगितले आहे.परवा बुधवारी ३१ मार्च रोजी शरद पवार यांच्यावर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल,सध्या सुरू असणारी औषधे बंद करण्यात आली आहेत.अशी माहिती मलिक यांनी दिली.शरद पवार यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

Previous articleगारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक व इतर मदत जाहीर करा
Next articleभाजपचा गौप्यस्फोट : राष्ट्रवादी आणि भाजपचं ठरलं तर,पहाटेचा शपथविधी झाल्यावर कळेल !