मोठा निर्णय : पहिली ते आठवीच्या परीक्षा घेणार नाही;सरसकट पास करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून,काही ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे.कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासादायक निर्णय घेतला आहे.राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.मात्र नववी ते अकरावीच्या परीक्षांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबत शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या की, कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता,इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यांकन न करता सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.त्याच प्रमाणे इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या परीक्षासंबंधी लवकरच निर्णय घेण्यात येईल.पहिली ते आठवीचे विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे.त्यात या विद्यार्थ्याने कशाप्रकारे अभ्यास केला हे बघितले पाहिजे. पण आताची परिस्थिती बघता हे यावर्षी ते होणे शक्य नाही.त्यामुळे राज्यात पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे. असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असल्याचे गायकवाड म्हणाल्या.कोरोनाच्या काळात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु होते.मात्र सध्या राज्यातील परिस्थितीमुळे यंदा इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता सरसकट पास करुन त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

महत्वाचे-
राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्व परीक्षा रद्द
नववी ते अकरावीबाबत लवकरच निर्णय
दहावीच्या लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान
बारावीच्या लेखी परीक्षा – २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान

Previous articleसर्वसामान्यांचा लोकल प्रवास बंद होणार ? धार्मिक स्थळे, नाट्यगृह,मॉल बंद करणार
Next articleकुणाचीही रोजी रोटी हिरावून घ्यायची नाही,पण जीवांची काळजीही घ्यावीच लागणार