सर्वसामान्यांचा लोकल प्रवास बंद होणार ? धार्मिक स्थळे, नाट्यगृह,मॉल बंद करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यासह मुंबईतील कोरोना रूग्णांच्या संख्या झपाट्याने वाढू लागल्याने आता मुंबईत कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.मुंबईतील धार्मिक स्थळे बंद केली जातील.मुंबईतील थिएटरसह, मॉल बंद करण्याबरोबरच गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबईतील लोकल मध्ये सर्वसामान्य प्रवाशांना असणारी प्रवासाची मुभा रद्द केली जाण्याचे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.हे कडक निर्बंध उद्यापासून लागू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राज्यासह मुंबईत कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होवू लागल्याने मुंबईतील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबईत उद्यापासून शुक्रवारपासून कडक निर्बंध लावण्यात येणार आहे.त्यानुसार हॉटेलमध्ये ५० टक्के प्रवेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.धार्मिक स्थळांच्या ठिकाणी वयोवृद्ध आणि लहान मुले मोठ्या संख्येने जात असल्याचे निदर्शनास आल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्याठी सर्व धार्मिक स्थळे बंद केली जाण्याची शक्यता महापौर यांनी वर्तविली आहे.तसेच गर्दीचे ठिकाण असलेले नाट्यगृह,मॉल बंद देखील बंद केली जाणार आहेत.मुंबईतील लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधील प्रवास बंद करून अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची मुभा दिली जाईल, असे महापौर यांनी सांगितले.कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे आदेश यापुर्वीच देण्यात आले आहेत.आता कार्यालयाचे कामकाज दोन शिफ्ट करण्यावर भर दिला जाईल. मुंबईतील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असेल तर कोरोना रोखण्यासाठी दुकाने एक दिवस सोडून उघडली जातील, असे त्यांनी सांगितले

मुंबईतील आढावा घेतला असता ३१ मार्चला ३ हजार ९०० बेड्स उपलब्ध असून, ३२४ आयसीयू तर १७० व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत.मुंबईतील रुग्णांची संख्या वाढत आहे, तसेच धोकादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यासाठी १६ हजारांहून २५ हजार बेड्स उपलब्ध करून दिले जात आहेत.या पार्श्वभूमीवर महापालिकेची बेड वाढवण्याची तयारी सुरू आहे.महानगरपालिकेची तयारी फुकट गेली तरी चालेल पण नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये, असेही महापौर म्हणाल्या. इमारतींमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी झोपडपट्टी आणि चाळीत कोरोनाचा प्रसार कमी असल्याचेही त्यांनी संगितले.

Previous articleलॉकडाऊन करायचा असेल तर अगोदर सर्वांच्या खात्यात ५ हजार जमा करा
Next articleमोठा निर्णय : पहिली ते आठवीच्या परीक्षा घेणार नाही;सरसकट पास करणार