राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्मनिर्भर म्हणवून घेणा-या भारतावर वाईट वेळ !

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनाचे संकट हाताळण्यात देशातील राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धेरणामुळे वाईट वेळ आली असल्याची घणाघाती टीका शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून करण्यात आली आहे.आज भारत तग धरून आहे तो नेहरू-गांधी यांनी निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेवर.नाहीतर कोरोनाच्या लाटेत सव्वाशे कोटी लोक कधीच नष्ट झाले असते असे स्पष्ट करून,गोरगरीब देश आपल्याला त्यांच्या ऐपतीने किडुकमिडुक मदत करीत असले तरी आपले पंतप्रधान २० हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी ‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्प थांबवायला तयार नाहीत अशा शब्दात सामनातून मोदींवर फटकारे ओढले आहे.
काय म्हटले आहे सामनाच्या आग्रलेखात ?

देशातील वाढत्या कोरोनाच्या संकटामुळे भारतापासून जगाला धोका असल्याची चिंता ‘युनिसेफ’नेही व्यक्त केली आहे.भारतात कोरोना ज्या वेगाने पसरत आहे त्यापासून संपूर्ण जग संकटात येईल.त्यामुळे भारताला कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी इतर देशांनी जास्तीत जास्त मदत करावी,असे युनिसेफतर्फे सांगण्यात आले आहे. बांगलादेशाने भारताला 10 हजार रेमडेसिवीर वायल्स देणगी दाखल पाठवल्या आहेत.भूतानसारख्या देशाने ऑक्सिजन पाठवला.नेपाळ,म्यानमार,श्रीलंकासारखे देशही आत्मनिर्भर भारताला मदतीचा हात पुढे करीत आहेत.भारत आज तग धरून आहे तो नेहरू-गांधी यांनी निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेवर.नाहीतर कोरोनाच्या लाटेत सव्वाशे कोटी लोक कधीच नष्ट झाले असते.भारतातील पेटलेल्या चितांचा धूर आजूबाजूच्या देशांना गुदमरून टाकत आहे.या धुरातून कोरोना आपल्या देशात पसरू नये यासाठी जगातील अनेक गरीब देश भारताला मदत करण्यासाठी सरसावले आहेत. कधीकाळी ही वेळ पाकिस्तान,रवांडा,कोंगोसारख्या देशांवर येत असे.मात्र आज आपल्या देशातील राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे ही वेळ आत्मनिर्भर म्हणवून घेणा-या भारतावर आली आहे.हे गोरगरीब देश आपल्याला त्यांच्या ऐपतीने किडुकमिडुक मदत करीत असले तरी आपले पंतप्रधान महोदय २० हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी ‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्प थांबवायला तयार नाहीत अशा शब्दात सामनातून मोदींवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.मागील १० दिवसांत भारतात ३६ हजार ११० कोरोनामुळे बळी गेले आहेत. हे आकडे धडकी भरवणारे आहेत.अमेरिका, ब्राझिलला आपण मागे टाकले आहे. हे चित्र बरे नाही. जगाला आता भारताची भीती वाटू लागली आहे. भारतात जाण्यापासून व्यापार-उद्योग करण्यापासून त्या देशांनी आपल्या लोकांना रोखले आहे. भारतात विमान आणि प्रवासबंदी केली आहे. याचा आर्थिक फटका भारताला बसला आहे.एवढे संकट असतानाही देश तग धरून राहिला आहे. तो ७० वर्षांपासून पंडित नेहरू,शास्त्री, इंदिरा गांधी,राजीव गांधी,नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी उभ्या केलेल्या योजना, प्रकल्प व आत्मविश्वासावरच.ती पुण्याई मोठी आहे.पंतप्रधान मोदी यांना देश सावरण्यासाठी कठोर परिश्रम व राजकारणविरहित राष्ट्रवादाचा विचार करावा लागेल असा सल्लाही अग्रलेखातून देण्यात आला आहे.

‘सेंट्रल विस्टा’सारख्या योजनांवर हजारो कोटी रुपये उधळायचे व त्याच देशाने बांगलादेश, भूतान,श्रीलंकासारख्या गरीब देशांकडून कोरोना निवारणासाठी मदत स्वीकारायची,याची खंत कोणाला वाटू नये याचे आश्चर्य वाटते. देशाची अवस्था भयावह बनली आहे. त्या भयाचा धसका दिल्लीश्वरांनी किती घेतला ते सांगता येत नाही, पण जगाने मात्र भारतातील या परिस्थितीचा मोठाच धसका घेतला आहे.कोरोनाच्या दुस-या लाटेचा धुमाकूळ सुरू असताना तिस-या लाटेची भिती व्यक्त करण्यात आली आहे.पण अशा संकटातही भाजपचे लोक आजही प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची राजकीय कोंडी करण्याचा नाद सोडायला तयार नाहीत. एखादे संवेदनशील किंवा राष्ट्रभक्त सरकार असते तर राजकीय फायद्या-तोटय़ाचा विचार न करता सर्वच पक्षांच्या प्रमुखांचे एक राष्ट्रीय पथक बनवून या संकटाशी कसे लढावे यावर सल्लामसलत केली असती, पण प. बंगालात एका राज्यमंत्र्यांच्या गाडीवर दगड पडल्याच्या बहाण्यातच केंद्र सरकार गुंग झाले आहे.सर्वोच्च न्यायालयाचे चाबूक इतके जोरात पडत आहेत की, त्यामुळे सरकारचे पुरते वस्त्रहरण झाले आहे असे फटकारेही या अग्रलेखातून ओढण्यात आले आहेत.

Previous article१९६२-६३ च्या दरम्यान मुंबईत आलेल्या शरद पवारांचा ५ वर्ष टिळक भवनात मुक्काम !
Next articleशरद पवारांना शेतकरी,मजूर,लोककलावंतांची उपासमार का दिसली नाही ?