३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवणार ? राजेश टोपेंनी केले मोठं वक्तव्य

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई,पुणे या मोठ्या शहरातील कोरोना रूग्ण संख्येत घट होत असली तरी राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोना रूग्ण संख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने येत्या १५ मे पर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे.मात्र राज्यातील एकंदरीत परिस्थिती पाहता येत्या ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात उद्या होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि पुण्यातील कोरोना रूग्ण संख्या कमी होत असली तरी राज्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे थैमान सुरूच आहे.नाशिक,सातारा,सोलापूर,सिंधुदूर्ग,अमरावती,अकोला, यवतमाळ,वर्धा,वाशिम,बुलढाणा या शहरांमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी राज्यात येत्या १५ मे पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.हा लॉकडाऊन वाढवणार का निर्बंध हटविले जाणार याची चर्चा असतानाच सध्या लागू असणारा लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे.त्यानुसार कोरोनाला थोपविण्यासाठी सध्या लागू असणारा लॉकडाऊन येत्या ३१ मे पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.उद्या मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता असून,या बैठकीत लॉकडाऊन येत्या ३१ मे पर्यंत वाढण्याबाबत चर्चा होवून निर्णय घेतला जाऊ शकतो.लॉकडाऊन किंवा ब्रेक दि चेनअंतर्गत जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत ते वाढवायचे की कमी करायचे या सर्व गोष्टींसंदर्भातील निर्णय या बैठकीत घेतले जाऊ शकतात,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

मुंबई,पुणे आदी शहरातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असली तरी लगेच पूर्ण लॉकडाऊन हटवला जाईल अशी अपेक्षा करु नका असेही टोपे यांनी म्हटले आहे.सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध लगेच कमी होणार नाही. निर्बंध हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकेल असही टोपे यांनी सांगितले.राज्यात असेलेला लॉकडाऊन काढून १०० टक्के मोकळीक होईल असे होणार नाही असे टोपे यांनी स्पष्ट केले.तर राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनचा चांगली फायदा झाल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.दुसरा लॉकडाऊन लागू करत असताना तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपली तयारी सुरु होती असेही शेख यांनी सांगितले.

Previous articleनरेंद्र मोदींनी देशाला ‘चीनचा कचरा,चिंता आणि चिता हे तीन ‘चि’ दिले !
Next articleअनिल देशमुखांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी ईडीकडून गुन्हा दाखल