अनिल देशमुखांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी ईडीकडून गुन्हा दाखल

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपमुळे सीबीआयने देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला केल्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे.हा गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.तर हा गुन्हा राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून देशमुख यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपनंतर देशमुख यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर आता देशमुख यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय (ईडीने) सुद्धा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे.त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रावर आरोप केले आहेत.केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राजकारण करत आहे हे स्पष्ट झाले आहे. त्याच पध्दतीने ईडीने गुन्हा दाखल केला आहे.हा गुन्हा राजकीय हेतूने आणि आघाडी सरकारला,पक्षाला बदनाम करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे.हे सर्व राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून देशमुख यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे असल्याचे मलिक यांनी सांगितले.

Previous article३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवणार ? राजेश टोपेंनी केले मोठं वक्तव्य
Next articleमराठा आरक्षण प्रश्नावर लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार : मुख्यमंत्री