संजय राऊत हे देश पातळीवरील नेते झाल्याने त्यांना देशाची जास्त चिंता: दरेकरांचा टोला

संग्रहित छायाचित्र

मुंबई नगरी टीम

मुंबई । संजय राऊत प्रभुरामाच्या भूमीबद्दल बोलत असताना आपल्या पांडुरंगाच्या भूमीत काय चाललं आहे या विषयी त्यांना भाष्य करायला वेळ नाही.कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पवित्र भूमीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना ग्रामीण भागातही परिस्थिति बिकट असल्याची दिसून येत आहे.परंतु संजय राऊत महाराष्ट्राच्या बाहेर पूर्णपणे गेले आहेत, संपूर्ण देशाची,देशपातळीवरील नेत्यांची काळजी त्यांना जास्त आहे. देश पातळीवर सध्या नेते होत असल्याकारणांमुळे देशाची चिंता जास्त असल्याची रोज त्यांच्या व्यक्तव्यातून दिसून असल्याची टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

निवडणूक आयोगाचा,न्यायालयाचा निर्णय आपल्या परीने, आपल्या बाजूने लागला नाही तर न्यायालयावर सुद्धा शंका निर्माण करत,टिका व्यक्त करण्याचे काम संजय राऊत करताना दिसून येतात. भाजप किंवा केंद्र सरकारच्या विरोधात निवडूक आयोगातून अथवा सर्वोच्च न्यायालयातून एखादा निर्णय झाला असेल तर कौतूक मविआ मधून आयोगाचे किंवा न्यायालयाचे कौतुक केले जाते त्यामुळे संजय राऊत आपल्या सोयीच्या भूमिका सातत्याने करत असतात. आपल्या सोयीचं असेल तर चांगलं आपल्या सोईचे नसेल तर वाईट या भूमिकेतून अशा प्रकारचे वक्तव्य संजय राऊत करत असून जनतेची दिशाभूल करत असल्याचे दिसून येते.महाराष्ट्राचे महाविकास आघाडी अहंकारणे चालले आहे, म्हणून केंद्राशी समन्वय साधायला नको. संकटाच्या काळात कोरोनाविषयी, मराठा समाजाविषयी केंद्राशी समन्वय साधन्यात महाविकास आघाडी सरकारला कमीपणा वाटतो, संकटच्या काळातही अहंकारापोटी वागत असून स्वतः अहंकारने भरले असल्यामुळे जग अहंकारी दिसतय, अशी टिका दरेकर यांनी मविआवर केली आहे.

मंत्रिमंडळाच्या बौठकीमध्ये भांड्याला भांडे लागले असेल पण आमची भांडी काचेची नाही. ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही. हमारे घर शीशे के नही है, कोई भी पत्थर मारे और टूट जाये, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले असून, कितीही कोणीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे मजबूत असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.त्यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले,भांडणाचा खणखणाट महाराष्ट्र सतत ऐकत असतो, तुमच्या काचेच्या घराला प्रचंड तडे गेले.असल्यामुळे काही विषय उघडीस होवून पुढील काळात घराला तडा जाईल की स्फोट होईल हे निश्चितपणे स्पष्ट होईल, अशी टिका दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

Previous articleमराठा समाजासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा : चंद्रकांत पाटीलांची मागणी
Next articleलॉकडाऊनच्या काळात राज्यातील व्यापार क्षेत्राचे ७० हजार कोटींचे नुकसान !