मुंबई नगरी टीम
नाशिक । राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे एका चिमुरडीच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.छगन भुजबळ हे आज नाशिक येथील येवला दौ-यावर असताना त्यांना ऐका चिमुरडीने स्वतःचे गाणे ऐकण्याची विनंती केली.भुजबळांनी देखील लगेच होकार देत तिला गायला सांगितले आणि तिच्या आवाजातीस सुंदर गाणे ऐकत भुजबळ मंत्रमुग्ध झाले.
आज माझ्या येवला मतदारसंघातील नांदूर या छोट्या गावातील श्री.गौतम पगारे यांची कन्या कु.आम्रपाली ही माझ्याकडे आली आणि माझे गाणे ऐका अशी विनंती तिने केली. या चिमुरडीचे मला फार कुतूहल वाटले तिला गायला सांगितल्यावर तिच्या गाण्याने मी मंत्रमुग्ध झालो.. अतिशय सुंदर आवाज असणाऱ्या pic.twitter.com/34eSElP7rX
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) June 13, 2021
येवला तालुक्यातील नांदूर या छोट्या गावातील गौतम पगारे यांची कन्या आम्रपाली हिने आज आपल्या आवाजात मंत्री छगन भुजबळ यांना गाणे ऐकवले. यावेळेस भुजबळ यांनी चिमुकलीचे गाणे ऐकत तिच्या गाण्याला दाद दिली व तिचे कौतुक देखील केले. यावेळी उपस्थित नागरिक देखील आम्रपालीच्या गाण्याने भारावून गेले.संगीत क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसतांना स्वयं मेहनतीने रियाजाने आम्रपाली हीने आपला आवाज जपला आहे याचे विशेष कौतुक असल्याचे देखील भुजबळ म्हणाले.यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी संगीत क्षेत्रात तिचे भविष्य उज्वल असून तिला शक्य तेवढी मदत करण्याचा शब्द आम्रपाली व तिच्या वडिलांना दिला आहे.