मुंबई नगरी टीम
मुंबई । राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेच्यावतीने मिळालेल्या आजच्या पुरस्कारामुळे राज्यातील कोट्यवधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी निश्चितच नव्याने बळ मिळेल,अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे सन २०१७-१८ साठी दिला जाणारा महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कार आज स्वीकारला. सभागृहात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी ह्या पुरस्करामुळे निश्चितचं नव्याने बळ मिळाले आहे. pic.twitter.com/1fZSquOIvp
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 6, 2021
महाराष्ट्र विधिमंडळातील कामकाजादरम्यान विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी जनसामान्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. दरेकर यांनी विधीमंडळात मांडलेल्या विविध समस्यांची मुद्देसुद मांडणी करत जनतेचे प्रश्न मांडून वस्तुस्थिती पुराव्यानिशी सादर करत जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला.विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन २०१७-१८ साठीचा दिला जाणारा महाराष्ट्र विधानपरिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कार विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना प्रदान करण्यात आला.यावेळी उपसभापती नीलम गो-हे उपस्थित होत्या.