दहावीचा निकाल उद्या ‘या’ वेबसाईटवर बघा आणि निकालाची प्रिंटआऊट काढा !

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे रद्द करण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार उद्या शुक्रवारी दुपारी १ वाजता आँनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळालेले गुण आँनलाईन निकालात उपलब्ध होतील.विद्यार्थ्यांना सदर निकालाची प्रिंटआऊट संकेतस्थळावरून काढून घेता येणार आहे.

२९ मार्च ते २० एप्रिल रोजी दहावीची परीक्षा घेण्यात येणार होती.मात्र राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. दहावीचा निकाल हा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार इयत्ता नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील लेखी अंतर्गत मूल्यमापन,दहावीतील अंतिम तोंडी,प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन याआधारे विद्यार्थ्यांना शाळांमार्फत गुण देण्याचा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला होता.मंडळस्तरावर ३ जुलै ते १५ जुलै अखेर निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली.त्यानुसार दहावीचा निकाल उद्या १६ जुलै रोजी १ वाजता आँनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.या शैक्षणिक वर्षात ९,०९,९३१ मुले तर ७,४८,६९३ मुलींनी असे एकूण १६,५८,६२४ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. निकाल http://result.mh-ssc.ac.in- www.mahahsscboard.in या वेबसाईटवर पाहता येईल.

Previous articleकाँग्रेसचे नेते राज्यपालांना भेटण्यासाठी सायकलने राजभवनावर जाणार
Next articleमोदी सरकारकडून इंधनावरील करातून जनतेची राजरोस लूट : नाना पटोले