वाचा : ‘या’ २५ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार तर ११ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल कायम राहणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील काही जिल्हे वगळता इतर भागात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असून,ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्येचे प्रमाण घटत आहे,अशा २५ जिल्ह्यांमधिल निर्बंध शिथिल करण्यात येणार आहे.तर ११ जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता या जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही.यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला असून,यावर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर यासंदर्भातील निर्णय जारी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

या ११ जिल्ह्यातील निर्बंध कायम राहणार

११ जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने पुणे,सोलापूर,सांगली,सातारा, कोल्हापूर,रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर,बीड आणि अहमनगरमध्ये निर्बंध कायम राहतील.

या २५ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करणार

परभणी,लातूर,जालना,नांदेड,हिंगोली,औरंगाबाद,उस्मानाबाद,अमरावती,गडचिरोली,गोंदिया,चंद्रपूर,नागपूर,बुलढाणा,भंडारा,यवतमाळ,वर्धा,वाशीम,हिंगोली,रायगड,ठाणे,मुबई,जळगांव,धुळे,नंदुरबार,नाशिक मधील निर्बंध शिथिल होणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची बैठक पार पडली.या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार रूग्णसंख्या घटलेल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमधिल निर्बंध कायम राहणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.निर्बंध शिथिल केल्यानंतर या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाला निर्बंधाबाबत अधिकार देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आला असून,यावर मुख्यमंत्री येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतील,असेही टोपे यांनी स्पष्ट केले.पुणे,सोलापूर,सांगली,सातारा,कोल्हापूर,रायगड,सिंधुदुर्ग,रत्नागिरी,पालघर,बीड अहमदनगर या जिल्ह्यात रूग्ण वाढ असल्याने या जिल्ह्यातील निर्बंध कायम राहणार आहेत.तर परभणी, लातूर,जालना,नांदेड, हिंगोली, औरंगाबाद,उस्मानाबाद,अमरावती,गडचिरोली,गोंदिया,चंद्रपूर,नागपूर,बुलढाणा,भंडारा,यवतमाळ,वर्धा,वाशीम,हिंगोली,रायगड,ठाणे,मुबई,जळगांव,धुळे,नंदुरबार,नाशिक मधील निर्बंध शिथिल होणार आहेत.मुंबईतील लोकल प्रवासाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे,असेही टोपे म्हणाले.

कोणते निर्बंध शिथिल करणार ?

ज्या २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत,त्यात शनिवार-रविवार लॉकडाऊन आणि खासगी कार्यालयांच्या वेळाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार, शनिवार-रविवार पूर्णपणे बंदऐवजी शनिवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू आणि फक्त रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले असल्यास ५० टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू करण्याची मुभा असेल.दुकाने,रेस्टॉरंट, सिनेमागृहे यांनाही या अटी लावून ते सुरू करण्यात येवू शकतात.तसेच व्यायामशाळांनाही यांना काही प्रमाणात निर्बंधांमधून सूट मिळण्याची शक्यता आहे.

Previous articleआशा भोसले या संगीतातील एक चमत्कार आणि दैवी शक्ती
Next articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट; काय झाली चर्चा ?