नारायण राणे प्रकरणावर शरद पवार यांनी दिली “शेलक्या” शब्दात प्रतिक्रिया

मुंबई नगरी टीम

मुंबई । केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अखेर राणे यांना अटक करण्यात आली आहे.राज्याच्या काही भागात शिवसेना व भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे चित्र आहे तर या प्रकरणावर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली असतानाच नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेलक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नाशिकसह अन्य जिल्ह्यात याचे पडसाद उमटले आहेत.काही ठिकाणी भाजपच्या कार्यालयावर दगडफेकीचे प्रकार घडले आहेत.राणेंच्या अटकेनंतर शिवसेनेसह भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राणे यांच्या या वक्तव्यावर शेलक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणावर मला काही बोलायचं नाही.मी त्याला फारसे महत्व देत नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात.अशा शेलक्या शब्दात पवार यांनी राणे प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Previous articleनारायण राणेंना सूडबुद्धीने अटक,अटकेच्या निषेधार्थ भाजप राज्यभर निदर्शने करणार
Next articleराज्यात बैलगाडी शर्यती महिनाभरात सुरू करण्याचे संकेत ।