राष्ट्रवादीतील प्रवेशाचे माझे स्वप्न सत्यात आले; सुरेखा पुणेकर यांचे मनोगत

मुंबई नगरी टीम

मुंबई । प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. पुणेकर यांच्यासोबत गायिका देवयानी बेंद्रे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात हाती घड्याळ बांधले. ‘राष्ट्रवादीत प्रवेश करून मला आनंद झाला. माझे स्वप्न होते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे ते आज पूर्ण झाले, अशा भावना पुणेकर यांनी व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,अशी टिपण्णी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्यावर बोलतांना पुणेकर म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. प्रवीण दरेकर फार चुकीचे बोलले. त्यांना महिलांचा आदर करता येत नसेल तर अवहेलना तरी करु नये. त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना त्रास होईल”,“सगळ्या पक्षांमध्ये लोककलावंत आहेत. माझा पक्षप्रवेश आहे म्हणून दरेकर असे बोलले. दरेकरांच्या वक्तव्यामुळे लावणी क्षेत्रातील स्त्रियांना खूप वाईट वाटले. माझ्यासारखी महिला एवढ्या कष्टाने घडली आहे. मात्र दरेकरांसारखे नेते असे चुकीचे विधान करतात. भाजपा सारख्या पक्षात दरेकर सारख्या नेत्यांचा उपयोग नाही.”, अशी टिका पुणेकर यांनी केली.

Previous articleप्रवीण दरेकरांच्या केसाला हात तर लावून दाखवा ; डॉ. उज्ज्वला जाधव यांचा इशारा
Next articleपुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू