महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय ; बातमीवर क्लिक करा आणि वाचा

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्य सरकारने पोलीस आयुक्त क्षेत्रातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास बारावरून आठ तास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील सर्व पोलीस आयुक्त क्षेत्रात या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती गृह विभागाने दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले आहेत

राज्यात अमरावतीसह काही पोलीस आयुक्तालयात महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वीच सलग १२ तासांची शिफ्ट ड्युटी आठ तासांची करण्यात आली आहे. आता सर्व पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पोलीस आयुक्त स्तरावर हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले आहेत. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.हा निर्णय घेतल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानले आहेत.

Previous articleराज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार; वाचा कोणते वर्ग केव्हा सुरू होणार ?
Next articleरस्त्यांची दुर्दशा बघून मंत्री संतापले; अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाईचे आदेश