भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचे काय झालं ? राष्ट्रवादीचे नेते ईडीच्या कार्यालयावर धडकणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । भाजपच्या ज्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत त्या केसमध्ये ईडीने काय कारवाई केली आहे याची विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ ईडी कार्यालयात जाणार असल्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपच्या अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली होती मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यात आली होती. या सर्व प्रकरणाची माहिती राष्ट्रवादीकडून संकलित करण्यात आली असल्याचे सांगतानाच संपूर्ण यादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मंत्री,नेते वेळ घेऊन ईडीच्या कार्यालयात जाऊन भाजप नेत्यांवरील कारवाईला गती का देत नाही, हे तपास का थांबले आहेत याची माहिती घेणार आहोत असेही मलिक यांनी सांगितले. ईडीला सहकार्य करण्यासाठी सगळी माहिती गोळा झाली आहे. ज्यांच्यावर तक्रारी दाखल आहेत त्या गतीमान करा असे आवाहनही ईडी अधिका-यांना करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

Previous articleगरिबांना लुटायचे आणि उद्योगती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रम
Next articleतीन वर्षात ३ हजार ४१४ किलो अंमली पदार्थ जप्त; किती मुद्दे मालाची विल्हेवाट लावली ?