मुख्यमंत्र्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज केव्हा मिळणार ? रुग्णालयाने दिली महत्वाची माहिती

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे.सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे.त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयाच्यावतीने आज स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी गेल्या आठवड्यात एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.याविषयीची माहिती स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.दोन-तीन दिवस रुग्णालयातच राहून उपचार घेणार असल्याचे ते म्हणाले होते.त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सर्व्हाइकल स्पाईन शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले आहे.त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले होते. आज मुख्यमंत्री कार्यलयातून मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती संदर्भात रुग्णालयाच्यावतीने माहिती देण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांवरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली आहे.त्यांची प्रकृती उत्तम असून,त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयाच्यावतीने आज स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous articleविधानपरिषदेची पोटनिवडणूकही बिनविरोध;काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड
Next articleमराठा समाजाची माफी मागा, पुन्हा आरक्षण मिळवून द्या : दरेकरांची सरकारकडे मागणी