ममता बॅनर्जींच्या भेटीवर काय म्हणाले ..शरद पवार ! केले मोठे वक्तव्य

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई दौ-यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आले असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या भेटीबद्दल माहिती दिली.ममता बॅनर्जी यांच्या मुंबईत येण्याच्या मागे पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने संबंध आहेत.या दोन

राज्यांमध्ये अनेक साधर्म्य असल्याने या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी मुंबईला भेट दिली आहे असे पवार म्हणाले.
देशात भाजपला सक्षम पर्याय तयार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आजच्या परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावर समान विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज असून,सर्व पक्षांनी एकत्र येवून नव्या नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे असेही पवार यांनी सांगतानाच सर्वांनी मिळून भाजपाला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे असे स्पष्ट केले. येणा-या लोकसभा निवडणुकीत हा पर्याय उपलब्ध होणे आवश्यक असल्यानेच त्यांनी भेट घेतली.आजची बैठक सकारात्मक चर्चा असेही पवार म्हणाले.ममता बॅनर्जी या भाजपाविरोधी आघाडीमध्ये काँग्रेसला वगळण्याच्या भूमिकेत असतानाच,पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.भाजपाविरोधात असलेल्या कोणत्याही पक्षासा एकत्र यायचे असेल, तर त्यांचे स्वागतच आहे.काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशिवाय हा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रश्नच नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.

आमच्यासाठी भाजपला सक्षम पर्याय उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा विषय असून, नेतृत्व कोणाचे असावे ही दुय्यम बाब असल्याचे ते म्हणाले.सर्व पक्षांना बरोबर घेऊन जाण्याचा मुद्दा आहे.कोणाला वगळण्याचा प्रश्न नाही. ज्याची मेहनत करायची तयारी आहे आणि सर्वांसोबत काम करण्याची तयारी आहे त्यांना सोबत घेऊन जायचे आहे, असे पवार यांनी सांगितले.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना भेटू शकल्या नाहीत.पण शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांची भेट घेवून चर्चा केली असेही पवार म्हणाले.

Previous articleनवाब मलिक यांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही : दरेकरांचे मलिकांना आव्हान
Next articleओमिक्रोन विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विमानतळावरील निर्बंध आणखी कडक