भायखळा आग्रीपाड्यात ‘उर्दू भवन’ उभारण्याचा शिवसेनेचा डाव

मुंबई नगरी टीम

मुंबई । सत्तेसाठी समझोता केलेल्या शिवसेनेकडून एका विशिष्ट समाजाला खूश करण्याचा प्रयत्न सध्या भायखळा,आग्रीपाड्यात सुरू आहे.महापालिका प्रशासनाकडून उर्दू भाषा केंद्र उभारण्याचा घाट घातला जात आहे. ही जागा सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी आहे आणि त्याचा वापर त्यासाठीच झाला पाहिजे. आम्ही स्थानिक नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.भायखळा, आग्रीपाडा येथील जागा औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण केंद्रासाठी राखीव आहे.तरीही महापालिकेच्या माध्यमातून येथे उर्दू भवन उभारण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. आणि उद्या येथे जनआंदोलन उभे राहिले तर याला महापलिकाच सर्वस्वी जबाबदार असेल, असा इशाराही दरेकर यांनी दिला.

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज प्रस्तावित उर्दू भवन येथील जागेची पाहणी केली. वेळ पडल्यास भाजपतर्फे येथे आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही दरेकर यांनी दिला. यावेळी महापालिकेचे स्थानिक अधिकारी उपस्थित होते. यावेळी दरेकर यांनी या जागेबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून समजावून घेतली. हे काम बेकायदेशीरपणे पुढे रेटून नेता येणार नाही, असेही प्रविण दरेकर म्हणाले. यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा, भाजपचे ज्येष्ठ नेते मधु चव्हाण, भायखळा भाजपा विधानसेभेचे अध्यक्ष नितीन बनकर यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleनाना पटोलेंवर कठोर कारवाई करा;भाजपाची राज्यपालांकडे मागणी
Next articleकवठेमहांकाळ मध्ये आबांचा लेक रोहित पाटीलचा डंका ! विरोधक चितपट