शाळांपाठोपाठ आता सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे सुरू होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात सोमवार दिनांक २४ जानेवारीपासून महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा सुरू होत असून, शाळांच्या पाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील सुरू करण्यात यावीत असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.

महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तसेच जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या-त्या ठिकाणी कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा व त्याला अनुसरून सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे व निवासी शाळा सुरू करावीत तसेच यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिले आहेत.राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत.अनेक ठिकाणी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असून,सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांमध्ये व निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत,त्या-त्या स्थानिक प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाने स्थानिक नियमावलीला अनुसरून व आवश्यक काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

Previous articleखासदार अमोल कोल्हेंनी नथुरामची भूमिका टाळली असती तर बरे झाले असते
Next articleस्थानिक परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे निर्देश