शरद पवारांची कोरोनावर मात; डॉक्टर,मित्र,सहका-यांचे मानले आभार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोनाची चाचणी नकारत्मक आली आहे.गेल्या आठवड्यात शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली होती.गेली आठ दिवस ते होम क्वारंटाईन होते. आज चाचणी केल्यावर ती नकारात्मक आल्यानंतर पवार यांनी ट्विट करीत याची माहिती दिली.

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली होती.कोरोनाची चाचणी सकारात्मक आल्याने ते होम क्वारंटाईन होते.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू होते.त्यामुळे त्यांनी आठवड्याभराचे कार्यक्रम रद्द केले होते.तसेच गेल्या दोन- तीन दिवसात संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करावी,असे आवाहन पवार यांनी केले होते.आठ दिवसांनंतर आज पवार यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यांची चाचणी नकारात्मक आली आहे.माझी प्रकृती बरी व्हावी म्हणून प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी मी माझे डॉक्टर,मित्र, सहकारी आणि हितचिंतकांचा आभारी आहे असे ट्विट त्यांनी केले आहे.

Previous articleराज्यात मास्क मुक्ती नाहीच; मास्क वापरणे बंधनकारक
Next articleदहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले महत्वाचे आवाहन