राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव; देबाशिष चक्रवर्तींना मुदतवाढ नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मावळते मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांना मुदतवाढ न मिळाल्याने ते आज निवृत्त झाले आहेत.सेवा ज्येष्ठतेनुसार मनुकुमार श्रीवास्तव यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागलेली आहे.

मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांना मुदतवाढ न मिळाल्याने ते आज निवृत्त झाले असून राज्याचे मुख्य सचिव म्हणून मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मनुकुमार श्रीवास्तव सध्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत.सेवा ज्येष्ठतेनुसार मनुकुमार श्रीवास्तव यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागली आहे.देबाशिष चक्रवर्ती यांच्या निवृत्तीनंतर मुख्य सचिवपदासाठी नितीन करीर आणि मनोज सौनिक यांच्या नावाची चर्चा होती. मात्र सेवा ज्येष्ठतेनुसार श्रीवास्तव यांना संधी मिळाली आहे.श्रीवास्तव यांनी मंत्रालयात नगरविकास, महसूल, गृह खात्यांचे सचिव म्हणून काम केले आहे.

Previous articleशिवाजी महाराजांचा अपमान होत असताना राज्यातील भाजप नेते गप्प कसे ?
Next articleशिक्षणमंत्र्याच्या कार्यालयातील कर्मचा-यांमुळे मंत्रालयातील आत्महत्येचा प्रयत्न टळला