प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यासाठी पालिकेने उधळला २७ लाखांचा निधी

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई महानगरपालिकेच्या आगामी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेले भौगोलिक सीमा राज्य सरकारने रद्द केल्या आहेत. पण या प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यासाठी पालिकेने एकूण २७.१० लाख रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयाकडे प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यासाठी आलेल्या खर्चाची माहिती मागितली होती. निवडणूक कार्यालयाने गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्यासाठी पालिकेने एकूण २७.१० लाख रुपये खर्च केले आहे. यात प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध करण्यासाठी शासकीय मुद्रण व लेखन सामग्री संचालनालय यांना १९.८७ लाख रुपये इतक्या रक्कमेचे अधिदान करण्यात आले आहे.तसेच हरकती व सूचना या कार्यक्रमासाठी हॉलच्या भाड्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांना ३.९७ लाख देण्यात आले आहे. अधिकारी-कर्मचारी यांच्या भोजनासाठी मेसर्स सेंट्रल कॅटरर्स यांस १.५३ लाख, व्हिडीओ शूटिंग, एलईडी स्क्रीन करिता मे. आरंभ एंटरप्रायजेस यांना १.५२ लाख रुपये, स्टेशन करिता मे. वसंत ट्रेडर्स यांना १८ हजार आणि मेसर्स विपुल यांस १८९ रुपये देण्यात आले आहे.राज्य सरकारने सीमा रद्द केल्या असल्यामुळे महानगरपालिकेने केलेला हा खर्च वाया गेला आहे.

Previous articleमंत्रिमंडळाचा निर्णय : राज्यात सौर ऊर्जा पार्क उभारणार
Next articleअन्यथा नोकरीची गरज नाही असे समजून कारवाई ! परिवहनमंत्र्यांचा एसटी कर्मचा-यांना इशारा