“महाराष्ट्रात योगी कुणीच नाही,आहेत ते फक्त सत्तेचे भोगी” ! राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात भोंग्यावरून राजकीय वातावरण तापले असतानात दुसरीकडे उत्तर प्रदेशात योगी सरकारने सुमारे ११ हजारापेक्षा अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत तर ३५ हजाराहून अधिक भोंग्याच्या आवाजावर नियंत्रण आणले आहे. यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना समाज माध्यमातून राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधत आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी अशा शब्दात टीकास्त्र सोडले आहे.

राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या सभेत भोंगे हटविण्यावरून राज्य सरकारला इशारा दिला होता.त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असतानाच दुसरीकडे भाजप शासित उत्तर प्रदेशात योगी सरकारने उत्तर प्रदेशमधिल सुमारे ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले आहेत तर ३५ हजारांपोक्षा अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर कौतुकाचा वर्षाव करीत राज्यातील ठाकरे सरकारवर तिकड शब्दात हल्लाबोल केला आहे.राज ठाकरे यांनी यांनी आज समाज माध्यमातून एक पोस्ट करीत उत्तर प्रदेशतील मशिदींवरील भोंगे हटवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार, असे म्हणत त्यांनी, राज्यातील महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे.आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी !, अशा शब्दात प्रहार केला आहे. या पोस्टच्या शेवटच्या ओळीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो,हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असे म्हणत ठाकरे सरकारला फटकारले आहे.

Previous articleमुंबई पोलीस आयुक्तांचा त्वरित राजीनामा घ्या; राज्यपालांकडे भाजपची मागणी
Next articleउत्तर प्रदेशात इतके वर्ष भोंगे चालत होते,मग ते काढण्यास भाजपला कुणी थांबवले होते ?