उत्तर प्रदेशात इतके वर्ष भोंगे चालत होते,मग ते काढण्यास भाजपला कुणी थांबवले होते ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । उत्तर प्रदेशात योगी सरकारने सुमारे ११ हजारापेक्षा अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत तर ३५ हजाराहून अधिक भोंग्याच्या आवाजावर नियंत्रण आणले आहे.यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशात इतके वर्ष भोंगे चालत आले आहेत.मग भाजपला भाजपला कुणी थांबवले होते ? आजच ही मागणी का केली जात आहे ? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.योगींनी उत्तरप्रदेशमध्ये काय करावे,हा त्यांचा अधिकार आहे.आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा आहे,असेही ते म्हणाले.

राज्यात भोंग्यावरून राजकीय वातावरण तापले असतानात दुसरीकडे उत्तर प्रदेशात योगी सरकारने सुमारे ११ हजारापेक्षा अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत तर ३५ हजाराहून अधिक भोंग्याच्या आवाजावर नियंत्रण आणले आहे. यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना समाज माध्यमातून राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधत आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर टीका आहे.यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर प्रदेश सरकारला टोला लगावला आहे.उत्तर प्रदेशात इतके वर्ष भोंगे चालत आले आहेत. मग भाजपला भाजपला कुणी थांबवले होते ? आजच ही मागणी का केली जात आहे ? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.योगींनी उत्तरप्रदेशमध्ये काय करावे,हा त्यांचा अधिकार आहे.आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्र सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा आहे.सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरबाबत आधीच नियमावली दिली आहे. उद्या जर एखादा निर्णय घ्यायचा असल्यास सर्वांसाठी एकच कायदा करावा लागेल. न्यायालयाने काही आदेश काढला तर सर्व धर्माच्या भाविकांना तो निर्णय लागू होईल, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात जातीय दरी निर्माण करुन आज जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सुरु आहे. नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

Previous article“महाराष्ट्रात योगी कुणीच नाही,आहेत ते फक्त सत्तेचे भोगी” ! राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Next articleराज ठाकरे,उद्धव ठाकरे,देवेंद्र फडणवीस आणि मविआच्या सभांचा महाराष्ट्रात धुरळा !