मुंबई नगरी टीम
नवी दिल्ली । भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.ही भेट नेहमीच माझ्यासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असते असं ट्विट पंकजाताईंनी केले आहे.
हमारे नेता और देश के प्रभावी गृहमंत्री,सहकार को उन्नत दिशा की ओर ले जाने वाले@AmitShah भाई शहा से भेट हुई। उनकी भेट हमेशा मार्गदर्शक और प्रेरणादायी होती है। pic.twitter.com/9JKt6uL0LW
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 29, 2022
पंकजाताई मुंडे दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. काल भाजपच्या बैठकीस उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध विषयांवर त्यांचेशी चर्चा केली. या भेटीचे ट्विट त्यांनी केलं आहे. “आमचे नेते, देशाचे प्रभावी गृहमंत्री आणि सहकार क्षेत्राला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारे अमितभाई शहा यांची भेट नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असते” असं त्यांनी म्हटले आहे.