मुंबई नगरी टीम
सांगली । गावातील दलित आणि सवर्ण आहेत आमचे मित्र कारण आमच्या मनात आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य उभारले.जर छत्रपती शिवाजी महाराज मुघलांशी लढले नसते तर आज कदाचित राज ठाकरे सुद्धा मुसलमान झालेले असते असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
आठवले यांच्या मूळगावी संगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडी या गावी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज भगवान बुद्ध तसेच सर्व महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी आठवले बोलत होते.आठवले यांचे मुळगाव असलेल्या ढालेवाडीतील त्यांचे घर नूतनीकरण करण्यात आले असून मातृदिनाचे औचित्य साधत या घराला मातोश्री नाव देऊन घराचे उदघाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावात महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. तोफा डाग अशा बुलंद घोषणा देत आम्ही आंबेडकरी विचार गावागावात पोहोचविला.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पायातील गुलामीच्या शृंखला तोडल्या.आम्ही डॉ बाबसाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांनी दलित मराठा मुस्लिम सर्व जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य उभारले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी मुकाबला केला नसता तर इतिहास वेगळा झाला असता. मराठी मुलुखात मुघल असते आणि आज कदाचित राज ठाकरे सुद्धा मुस्लिम असते असे आठवले म्हणाले.