पहिल्या दिवशी केवळ २ हजार ६०० अभ्यागत मंत्रालयात

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनाचे सर्व निर्बंध उठवल्यानंतर आजपासून सर्वसामान्य जनतेसाठी मंत्रालयाची दारे खुली झाली मात्र बुधवार असूनही केवळ २ हजार ६०० अभ्यागतांनी मंत्रालयात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.दुपारी दोन नंतर सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश देणार आला.यासाठी प्रवेश पत्रिका देण्यासाठी सुमारे १० खिडक्यांची सोय करण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर आज बुधवारपासून सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश देण्यात आला.निर्बंधापूर्वी बुधवारच्या दिवशी हजारोच्या संख्येने जनता मंत्रालयात आपली गा-हाणे घेवून येत असत मात्र आज सर्वसामान्य जनतेसाठी मंत्रालयाची दारे खुली करण्यात आली असली तरी आज केवळ २ हजार ६०० जणांनीच मंत्रालयात प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे.सर्वसामन्य जनतेला मंत्रालयातील प्रवेशासाठी प्रवेश पत्रिका देण्यासाठी १० खिडक्यांची सोय करण्यात आली होती. या खिडक्यांवरून नागरिकांना प्रवेश पत्रिका दिल्या जात होत्या.ज्येष्ठ नागरिकांना दुपारी १२ नंतर तर सर्वसामान्य जनतेला दुपारी २ नंतर प्रवेश दिला जात होता.गेल्या दोन वर्षात मंत्रालयात केवळ अधिकारी आणि बैठकांना उपस्थित राहणा-या व्यक्तींनाच प्रवेश दिला जात होता.आज सर्वसामान्य जनतेसाठी मंत्रालय खुले करण्यात आले त्यामुळे मंत्री आणि सचिव दालनात गर्दी झाल्याचे चित्र होते.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंत्रालयात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे शासकीय कामांसाठी येणा-यांची अडचण निर्माण झाली होती. सर्वसामान्यांना पुन्हा मंत्रालयात प्रवेश देण्याची मागणी जोर धरू लागली होती.त्यामुळे अखेर आज १८ मे पासून प्रवेश देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला. त्यामुळे मंत्रालयात येणा-या अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्वी असलेली व्हिआरएमएस (व्हिजिटर पास मॅनेजमेंट सिस्टिम) पुन्हा लागू केली.मंत्रालयात प्रवेश नसल्यामुळे विविध प्रकारचे अर्ज मंत्रालयाच्या प्रवेशव्दारावरच स्वीकारले जात होते.त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती.आता मंत्रालयाच्या दारे सर्वसामान्य जनतेला खुली केल्याने आता थेट मंत्री कार्यालयात जाऊन निवेदन- अर्ज सादर करता येतील.आज तुरळक गर्दी असली तरी आठवड्यापासून मंत्रालयात पुन्हा वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.मंत्रिमडळाच्या बैठकीच्या दिवशी तर मंत्रालयात सरकारी पाच ते सात हजार अभ्यागत येत असतात.

Previous articleमशीद,हिजाब,हलालावर गोंधळ घालणारे बेरोजगारी महागाई, इंधन दरवाढीबाबत गप्प का ?
Next articleफडणवीसांना उशिरा का होईना पेट्रोल,डिझेल आणि गरीबांच्या रोजगाराची जाणीव झाली