दोन्ही पक्षांचं सहकार्य मिळालं, पण माझ्या काही लोकांनी दगा दिला : मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाले आहे.महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात असल्याने राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.तसेच वेगवेगळ्या विचारसरणीच्या तीन पक्षांनी एकत्र येऊन काम करत असताना केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. अस्थिर झालेल्या सरकारला राज्यपालांनी उद्या गुरूवारी विधानसभेत बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षात दोन्ही पक्षांनी केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.तुम्ही जे सहकार्य केले त्यासाठी धन्यवाद! आता जी कायदेशिर प्रक्रिया आहे त्याला सामोरे जाऊ असे सांगून, मला माझ्याच लोकांनी धोका दिला म्हणून सध्याची परिस्थिती निर्माण झाली असून, हे दुर्देवी आहे. या माझ्याकडून कुणाचा अपमान झाला असेल, किंवा कुणी दुखावले असतील तर मी माफी मागतो, असेही मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणाले.मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माध्यमांशी बैलताना म्हणाले की, माझ्या पक्षाच्या काही लोकांनी दगा दिला, हे दुर्भाग्य आहे. त्यांनी साथ दिली नाही.

Previous articleनवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील यांचे नाव
Next articleठाकरे सरकार कोसळले : अखेर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा