पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल : जयंत पाटलांचे भाकित

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावून पंधरा दिवसाचा कालावधी उलटून गेला नाही तोच राज्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल अशी आशा माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी शिवसेनेच्या आमदारांनी पक्षादेश झुगारून मतदान केले आहे.या वादावर सर्वोच्च न्यायालयाने याचा निवाडा करण्यासाठी खंडपीठ नेमण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे येत्या तीन-चार महिन्यांमध्ये याचा निकाल लागेल. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याची वेळ येईल,असे भाकित माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिल्याने या आमदारांना अपात्र करण्याची मागणी शिवसनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आली आहे.विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी शिवसेनेच्या आमदारांनी पक्षादेश झुगारून मतदान केले आहे.या वादाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये होईल.खंडपीठाची नेमणूक हीच सर्वोच्च न्यायालयाची कृती अतिशय गंभीर आहे.विधिमंडळात जे काम झाले आहे, ते सर्वोच्च न्यायालयाने अतिशय गांभीर्याने घेतले आहे, हा त्याचा संदेश असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींची नियुक्ती झाल्यावर या खंडपीठाचे कामकाज सुरु होईल. त्यातून या सगळ्याचा उलगडा होईल. त्याला काही काळ लागेल, मात्र देर है अंधेर नही है.असे जे म्हणतात ते सर्व यामध्ये घडेल. हा निकाल लागल्यावर पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

Previous articleशिवसेना जेव्हा जेव्हा फुटली त्यामागे शरद पवारांचा हात : दिपक केसरकरांचा गंभीर आरोप
Next articleशिंदे सरकारचा मोठा दिलासा : राज्यात पेट्रोल पाच तर डिझेल तीन रूपयांनी स्वस्त होणार