शिंदे सरकारचा मोठा दिलासा : राज्यात पेट्रोल पाच तर डिझेल तीन रूपयांनी स्वस्त होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारने पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लीटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेवून राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे.या निर्णयामुळे पेट्रोल पाच तर डिझेल तीन रूपयांनी स्वस्त होणार आहे.पेट्रोल-डिझेलचे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाल्याने केंद्र सरकारने इंधनावरील कर कपातीचा निर्णय घेतला होता.भाजप शासित राज्याने केंद्र सरकारच्या आवाहानुसार इंधन दरात कपात करून दिलासा दिला होता.मात्र राज्यातील महाविकास आघाडीने सरकारने राज्यात कर कपात करण्याचा निर्णय घेतला नव्हता.त्यामुळे इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रात इंधनाचे दर वाढलेले होते.राज्यात सत्तांतर झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात इंधनावरील कर कपातीचे संकेत दिले होते.आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लीटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल पाच तर डिझेल तीन रूपयांनी स्वस्त होणार आहे.पेट्रोल-डिझेलचे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.या कर कपातीमुळे राज्यातील जनतेला महागाईपासून दिलासा मिळेल.शिवाय या कर कपातीच्या घोषणेमुळे राज्यातील जनतेला ६ हजार कोटी रुपयांच्या करातून दिलासा मिळणार आहे.

Previous articleपुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येईल : जयंत पाटलांचे भाकित
Next articleमविआच्या निर्णयाला शिंदेंची स्थगिती : आता नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेमधून होणार