मुंबई नगरी टीम
मुंबई । आज केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला ढाल तलवार हे चिन्ह दिले आहे.येत्या काळातील निवडणुकांमध्ये मशाल विरूद्ध ढाल तलवार असा सामना रंगणार असे चिन्ह असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिंदे गटाला दिलेल्या चिन्हावरून निशाणा साधला आहे.भारतीय जनता पार्टीची ढाल आणि गद्दारीची तलवार अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह दिल्याने आगामी निवडणुकांमध्ये ढाल तलवार विरूद्ध मशाल अशी लढत रंगणार आहे.मात्र त्यापूर्वीच निवडणूक चिन्हावरून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे.शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या चिन्हावरून निशाणा साधल्यावर आता उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला मिळालेल्या ढाल तलवार निशाणी वरून शिंदे गटाला लक्ष्य केले आहे.भारतीय जनता पार्टीची ढाल आणि गद्दारीची तलवार अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली आहे.