खूशखबर : दिवाळीनिमित्त शासकीय कर्मचाऱ्यांना बिनव्याजी १२ हजार ५०० रूपयांचा अ‍ॅडव्हान्स मिळणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी मान्यता दिली.यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट क व गट ब या अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे.

उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी १२ हजार ५०० एवढी रक्कम दिली जाणार असून १० समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे.यापूर्वी २०१८ साली हा उत्सव अग्रीम मिळाला होता. अग्रीम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ५ लाख इतकी आहे. दिवाळीच्या काळात या अग्रीमाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याकडे होतो. परिणामत: अप्रत्यक्षरित्या शासनाला महसूल वाढ मिळते.दरम्यान वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर राज्यसवेतील अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळी सण साजरा करणे सुलभ व्हावे यासाठी या ऑक्टोंबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी म्हणजेच २१ ऑक्टोंबर पूर्वी द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे.

Previous articleराष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांचा भाजपात प्रवेश
Next articleबिनविरोधाचे प्रयत्न फेल : अंधेरी पोटनिवडणुकीत ‘या’ ६ अपक्षांनी अर्ज कायम ठेवल्याने निवडणूक अटळ