नंबर १ असल्याचा भाजपाचा दावा : भाजप शिंदे गटाचा ४७८ तर मविआचा २९९ ग्रामपंचायतींवर विजय

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा निकाल आज जाहीर झाला असून,या निवडणूकीत भाजप आणि शिंदे गटाला ५०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.तर उपलब्ध ८८९ ग्रामपंचायतींच्या निकालांपैकी सर्वाधिक ३९७ ग्रामपंचायती जिंकून भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा नंबर वन पक्ष ठरला असल्याचा दावा भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

राज्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना युतीला एकूण ४७८ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला असून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना एकूण मिळालेल्या २९९ ग्रामपंचायतींपेक्षा युतीचे संख्याबळ खूप जास्त आहे.राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर दुसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने नव्या सरकारला आणि भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीला कौल दिला आहे असे सांगून बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.या निवडणूकीत शिंदे गट आणि भाजपने ५०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजय मिळवला असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

Previous articleबिनविरोधाचे प्रयत्न फेल : अंधेरी पोटनिवडणुकीत ‘या’ ६ अपक्षांनी अर्ज कायम ठेवल्याने निवडणूक अटळ
Next articleमोठा दिलासा : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार आणि निवृत्ती वेतन मिळणार