मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं झोपतात केव्हा,हा खरंतर संशोधनाचा विषय : उपमुख्यमंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांची तारीफ

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात सत्तापालट होवून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून तीन महिन्याचा कालावधी झाला आहे.मात्र या तीन महिन्यात चर्चा आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या झपाट्याची.मुख्यमंत्री शिंदे हे पहाटे पर्यंत शासकीय कामकाज करीत गाठीभेटी घेत असतात त्यामुळे ते नक्की केव्हा झोपतात हाच प्रश्न सर्वांना पडलेला असतो.मुख्यमंत्री शिंदे यांच्या काम करण्याच्या धडाकेबाज स्टाईलवरही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान केले आहे.मुख्यमंत्री शिंदे नेमकं झोपतात केव्हा, हा खरंतर संशोधनाचा विषय आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी म्हटले आहे.

मेघदुत या शासकीय निवास्थानी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.वर्षा ते सागर बंगला हा प्रवास कसा वाटतो ( मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणे ) असा प्रश्न विचारला असता,वर्षा ते सागरचा प्रवास म्हणजे वर्षा अखेर सागरातच जाऊन मिसळते.शेवटी तुम्ही कुठे राहता हे महत्वाचे नाही पण तर तू तुम्ही काम काय करता हे महत्वाचे आहे असे उत्तर फडणवीस यांनी दिले.सध्याच्या राजकीय वातावरणात कटुता वाढली आहे, हे वास्तव असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.मी पहाटे तीन वाजेपर्यंत शासकीय कामकाज करतो आणि सकाळी आठ वाजता उठतो आता ती सवय झाली आहे असेही एका प्रश्नांच्या उत्तरात त्यांनी सांगितले.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झोपतच नाहीत असे वाटते. त्यांना पूर्वीपासून ती सवय आहे.मुख्यमंत्री शिंदे केव्हा झोपतात,हा खरंतर संशोधनाचा विषय,असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांच्या झोपेवर फडणवीसांनी यावेळी भाष्य केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दिवाळी शुभेच्छांचा फोन आला होता का असा प्रश्न उपस्थित केला असता,शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांचा दिवाळी शुभेच्छांचा फोन आलेला नाही पण दिवाळी अजून संपलेली नाही,त्यामुळे दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला हरकत नाही असेही त्यांनी दिलखुलास उत्तर दिले.राज्यात परतीच्या पावसामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र त्यांना अद्याप मदत मिळाली नाही याकडे त्यांचे लक्ष वेधले असता,शेवटचा पाऊस झाला त्याची मदत बाकी आहे.मात्र मागच्या दोन अडीच वर्षात जी मदत शेतकऱ्यांना जाहीर झाली ती अद्याप मिळालेली नाही.आमच्या सरकारने घोषणा केली आणि दोन महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहचवले असल्याचे त्यांनी सांगितले.गृहमंत्री झाल्यावर नकारात्मक गोष्टीच जास्त ऐकाव्या लागतात.त्यामुळे सकाळची ब्रिफींग बंद करून आता दुपारची ब्रिफींग सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले.नुकतीच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची निवडणूक झाली यात एका खेळाडूचा पराभव झाला असा प्रश्न त्यांना केला गेला.महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत यापूर्वी राजकारणी निवडून आलेच नाहीत असे झाले नाही. फक्त एकदाच खेळाडू अध्यक्षपदी निवडून आला आहे.खेळाडू नेहमीच उत्तम प्रशासक असी शकत माही.यापूर्वीचे अध्यक्ष खेळाडू नसतानाही त्यांनी उत्तम प्रकारे प्रशासन चालवले आणि यशस्वी संस्था बनवली असेही फडणवीस यांनी सांगितले.

तुम्हाला राग येतो का ? असा प्रश्न विचारल्यावर फडणवीसांनी आपले मत व्यक्त केले. मला तेव्हाच राग येतो जेव्हा मला खूप भूक लागलेली असते,असे फडणवीस यांनी सांगितले. माझ्याकडे खूप सहनशीलता आहे,गेल्या २५ वर्षांत तुम्ही पाहिलेच आहे असे सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत.यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेतही दिले.सध्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री नसल्याचे त्रास होत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleमोदी सरकारचा ‘रोजगार मेळावा’ निवडणुकीच्या तोंडावरचा केवळ एक इव्हेंट
Next articleगद्दारांनी खोके स्वतःकडे ठेवले, शेतक-यांच्या मदतीसाठी दिले नाहीत ; आदित्य ठाकरेंचा प्रहार