आमदार सरोज अहिरे आपल्या अडीच महिन्याच्या बाळासह विधानभवनात ; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई नगरी टीम

नागूपर । राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला आज येथे सुरूवात झाली.आज विधानभवन परिसरात एकच चर्चा होती ती राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचीच. त्या विधानभवनात आल्या त्या आपल्या अडीच महिन्याच्या बाळासह.आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे आणि त्यांच्या अडीच महिन्याच्या बाळाने.आमदार सरोज अहिरे यांनी विधानभवनात प्रवेश केला तो आपल्या अडीच महिन्याच्या बाळासह.त्यांच्या जवळ असणा-या अडीच महिन्याच्या बाळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली. अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आल्या त्या आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळासमवेत.याबाबत मुख्यमंत्री श्शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी आमदार सौ. आहेर यांची भेट घेऊन त्यांची आणि बाळाची विचारपूस केली. विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर कौतुक केले. यावेळी आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ आणि सासुबाई कल्पना वाघ हे देखील उपस्थित होते.

Previous articleआणि देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्या आमदाराला दिली मंत्रीपदाची ऑफर
Next articleऐकावे ते नवलच : खबरदारी म्हणून विधानभवन परिसरात शाईचे पेन घेऊन जाण्यास बंदी