मुंबई नगरी टीम
मुंबई । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे.सगेसोयरे संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खाल्यावल्याने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले असून, सगेसोयरे संदर्भात सरकारने त्वरीत निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती ठासळली आहे.त्यांनी औषधोपचार घेण्यास नकार दिल्याने राज्य सरकार समोर मोठा पेच निर्माण झाला आहे.याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.त्यामुळे या एक दिवसीय विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.येत्या २६ फेब्रुवारी पासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे.मात्र मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतल्याने मराठा समाजाचे या विशेष अधिवेशनाकडे लक्ष लागले आहे.