पुरग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या
मुंबई नगरी टीम
कोल्हापूर : सरकार घाबरायला लागलं आहे म्हणून कोल्हापुरात जमावबंदीचा आदेश लागू केलाय अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी येथे केली.
पूरपरिस्थिती सरकारला हाताळता आली नाही. सरकारची मदत खूप उशिरा पोहोचली. बोटी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची होती; पण तसं झालं नाही असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.पूर ओसरल्यानंतर राज्य सरकारने पुरग्रस्तांच्या घराचे पंचनामे तात्काळ करुन मदत करावी. १० हजार आणि १५ हजाराची मदत अत्यंत तोकडी असूनशेतमजुरांना आता लवकर मजुरी मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतमजुरांना उदरनिर्वाह करण्यासाठी साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही पाटील यांनी केली.प्रत्येकाला एक महिन्याचा रोजगार उपलब्ध करून द्यावा. शिवाय पाण्याखाली गेलेल्या पिकांना तात्काळ मदत करावी. पाण्याखाली असणाऱ्या ऊसाला १ लाख रुपये तर भात आणि नाचणीसाठी ४० हजार रुपये अनुदान द्यावे अशीही मागणी त्यांनी सरकारकडे केली.
पुरग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. विद्यार्थाची फी माफ करून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे असेही पाटील यांनी सांगितले.कर्नाटक येथील अलमट्टी धरणातील प्रशासनाने पाणी सोडण्याबाबत जाहीर केलेली आकडेवारी चुकीची आहे अशी जोरदार टीका करतानाच पूरपरिस्थिती हाताळण्यामध्ये सरकार आणि प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका सरकारवर ठेवला.