बर्थडे गर्ल अभिनेत्री दिशाने दिल्या आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्याचे पर्यंटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री आणि जिचा आजच २८ वा वाढदिवस आहे त्या बर्थडे गर्ल अभिनेत्री दिशा पटाणी हिने शुभेच्छा दिल्या आहेत.वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेस तसाच अमेझिंग राहा आणि चमकत राहा असे ट्वीट करून दिशाने अभिष्टचिंतन केले आहे.

राज्याचे पर्यंटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज ३० वा वाढदिवस आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आदित्य ठाकरे यांना मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून संधी देण्यात येवून त्यांच्याकडे त्यांचे आवडते पर्यंटन आणि पर्यावरण हे खाते सोपविण्यात आले.मंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच वाढदिवस जोरदार साजरा करण्याचा तयारी युवा सेनेने केली होती. मात्र राज्यात सध्या असणारे कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करता रूग्णांना आणि मुख्यमंत्री  निधीला मदत करण्याचे आवाहन केल्याने आज राज्यात त्यांचा वाढदिवस गोरगरिबांना, रूग्णांना मदत करून तर काही ठिकाणी आरोग्य शिबीरे आयोजित करून साजरा करण्यात आला.त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक मंत्री, नेते,बडे राजकारणी तसेच उद्योग जगतातील व्यक्तींनी त्यांना समाज माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत आज प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटाणी हिचा २८ वा वाढदिवस आहे.तीच्या अनेक चाहत्यांनी ट्विटरवरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.मात्र दिशा पटाणी हिने आपल्या चाहत्यांचे आभार व्यक्त करण्यापूर्वीच पर्यंटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.“वाढदिवसाच्या शुभेच्छा, आहेस तसाच अमेझिंग राहा आणि चमकत राहा” अशा शुभेच्छा दिशा पटाणीने दिल्या आहेत.

Previous article..तर राज्यात सलून सुरू करण्यास सरकारची परवानगी !
Next articleमुख्यमंत्री उद्या रायगड दौऱ्यावर ; मदत साहित्य आणि अनुदान वाटप करणार