मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार,असे दावे वारंवार विरोधकांकडून केले जात आहेत.त्याला आता राष्ट्रवादीत नव्याने सामिल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.भाजप सोडून जाणा-यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असे सांगितले जाते.मात्र, राज्य सरकार पडणार नाही,असे खडसे यांनी म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
“अनेकांना भाजप सोडण्याची इच्छा आहे.त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कोसळणार असे पक्षाकडून सांगितले जाते.पण,राज्य सरकार कोसळणार नाही,अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी एकनाख खडसेंसह त्यांच्या कन्या रोहिणी आणि काही कार्यकत्यांनी देखील राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्याकेल्या खडसेंनी विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपवर चांगलाचा घणाघात केला. ४० वर्षे पक्षासाठी निष्ठेने काम करून देखील आपल्यावर अन्याय झाला, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली. तर ज्या निष्ठेने आपण भाजपचे काम केले.त्याच निष्ठेने आपण राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचा शब्द खडसेंनी शरद पवारांना दिला. दरम्यान, आपल्यावर भूखंड लाटल्याचे आरोप लावण्यात आले. परंतु काही दिवस थांबा कुणी कीती भूखंड घेतले ते सांगतो, असा इशार देत खडसेंनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.