पुणे पदवीधर मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांना भाजपकडून उमेदवारी ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदार संघातून विद्यमान भाजपाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या ऐवजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.भाजपच्या या निर्णयामुळे कोथरूड मधील भाजप कार्यकर्ते आणि मेधा कुलकर्णी नाराज होत्या.त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती.कुलकर्णी यांची समजूत काढत त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन पक्षाकडून दिले असल्याची चर्चा असतानाच मे महिन्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत कुलकर्णी यांना पुन्हा डावलल्यात आले.या निवडणुकीत भाजपने रणजीतसिंह मोहिते पाटील,गोपीचंद पडळकर,प्रवीण दटके आणि रमेश कराड यांना संधी दिली होती.कुलकर्णी या भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती.तर पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपाकडून त्यांना उमेदवारी नाकारली जाणार असल्याची चर्चा सुरू होताच मेधा कुलकर्णी मनसेमध्ये प्रवेश करणार असल्याची समाज माध्यमांत सुरू होती.कुलकर्णी यांनी या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
प्रसारमाध्यमांत माझ्याबद्दल ज्या बातम्या फिरत आहेत त्यामध्ये काहीही तथ्य नाही.भाजप माझ्याबद्दल जो काही निर्णय घेणार असेल तो मला मान्य असेल, पक्षाकडून जे आदेश येतील त्यानुसार मी माझी कामे करणार आहे. पदवीधर मतदारसंघासाठी सध्या नोंदणी उपक्रम हातात घेतला असून यापुढेही पक्षाच्या ध्येय धोरणांप्रमाणेच काम करत राहणार असल्याचे कुलकर्णींनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे कुलकर्णी यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Previous articleअर्णब गोस्वामी अटक : शिवसेना भाजपमध्ये ‘पोपटावरून’ रंगला कलगीतुरा
Next articleउद्यापासून राज्यातील थिएटर्स,नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्स सुरू होणार