मुख्यमंत्र्यांचा ग्रामीण विकासाला विरोध : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई नगरी टीम

कऱ्हाड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ग्रामीण विकासविरोधी असून त्यांची मानसिकता शहरी नगरसेवकाप्रमाणे आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही सडकून टीका केली.

चव्हाण म्हणाले की,शहरी आणि ग्रामीण भागाचा समांतर विकास झाला पाहिजे.परंतु मुख्यमंत्र्यांचा ग्रामीण विकासाला विरोध आहे, असा आरोप त्यांनी केला.मोदी सरकारवर चव्हाण यांनी कडाडून टीका केली.सत्तेसाठी धार्मिक दंगली घडवून विरोधकांमध्ये वितुष्ट आणायचा कट सरकारने रचला आहे.देशात हुकूमशाही राजवट आणायची नसेल तर नरेंद्र मोदी यांना देशातून आणि राज्यातून हुसकावून लावा, असे आवाहन त्यांनी केले.मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना अमेरिकेने व्हिसा नाकारला होता.पंतप्रधान झाल्यावर त्यांनी भरपूर परदेश दौरे केले.कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मोदी यांनी उत्तरे दिली नाहीत. मन की बात मधून त्यांनी जनतेची दिशाभूल केली, अशी जोरदार टीका  चव्हाण यांनी केली.

Previous articleमोदी यांची थापांची पतंगबाजी
Next article३५ हजार कोटीच्या कर्जमाफीचे स्वप्न कधी साकार होणार : सुप्रिया सुळे