१ फेब्रुवारीपासून केबल बंद ? : शिवसेनेचा इशारा

मुंबई नगरी टीम

मुंबई :  ट्रायने लोकांना जेवढे पसंतीचे चॅनल पाहता तेवढेच पैसे मोजण्याची योजना आणली पण ही टेरिफ आर्डर कोणाच्या हिताची आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील १ फेब्रुवारीपासून टीव्ही बंद झाल्यास केबलचालकांचा संबंध नाही, असा इशारा शिवसेनेच्या केबल चालकांच्या संघटनेचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिला आहे.सरकारने आडमुठेपणा न करता, तीन महिन्यांची मुदतवाढ करावी अशी मागणी परब यांनी करतानाच  ट्रायसोबतची चर्चा निष्फळ झाल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकांना स्वतःचे चॅनेल निवडण्याचा अधिकार आहे ही सरकारची भूमिका आम्हाला योग्य वाटली होती, म्हणून आम्ही सहकार्य केले. परंतू, नंतर या योजनेतल्या त्रुटी समोर आल्या आहेत. आम्ही २०० रुपयांपासून २०० ते ३५० चॅनेल दाखवत होतो. मात्र, ट्रायने तेव्हा छोटे बुके विकण्यास मनाई केली आता तेच पुन्हा छोटे छोटे बुके बनवण्यास सांगत आहेत. नव्या नियमानुसार या चॅनलची रक्कम मोजल्यास ती ४५० रुपयांपेक्षा अधिक मोजावी लागणार आहे. आधी याच चॅनलसाठी आम्ही ३०० रुपये आकारत होतो. रोज किंमती बदलत असल्याने ग्राहकांना कसे तोंड द्यायचे, असा आरोपही त्यांनी उपस्थित केला.

सर्व कंपन्यांनी त्यांचे चॅनल निवडून वेगवेगळे असे २५ ते ३० बुके बनविले आहेत. यामुळे ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे. नव्या टेरिफ आदेशावर सहमती घेतल्याशिवाय लागू करणार नसल्याचे ट्रायने सांगितले होते. मात्र, ग्राहकांकडून भरून घ्यायचे अर्ज अद्याप आमच्याकडे आलेले नाहीत. १ फेब्रुवारीपासून नवे नियम लागू करणार आहेत.यामुळे चॅनलचा बुके न विकता केबलचालक एक एक चॅनल ग्राहकांना विकतील आणि त्यानुसारच पैसे आकारतील, असेही त्यांनी सांगितले.

Previous articleसमाज माध्यमांवर निवडणूक आयोगाचे निर्बंध !  
Next articleशिवसेनेची मुख्यमंत्र्याची अट भाजपला अमान्य