निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळले पाहिजे : खडसे

मुंबई नगरी टीम

जळगाव : निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळले पाहिजे,असा घरचा अहेर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज  सरकारला लगावला. त्यांनी हे विधान आमदार उन्मेष पाटील यांना उद्देशून केले असले तरीही वरिष्ठांना टोला असल्याचे मानले जाते. तसेच ज्यांना घडवले त्यांनीच साथ सोडली अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.

अनेक वर्षे पक्षाच्या खस्ता खाल्ल्या. अनेक जणांना घडवले पण त्यांनीच साथ सोडली.राजकारणात स्वार्थीपणा वाढला असून सूडबुद्धीने राजकारण केले जात आहे असा टोला त्यांनी लगावला. मात्र हा टोला कुणाला होता याची जोरदार चर्चा सुरू आहे.पक्षात जुन्या कार्यकर्त्याना कालबाह्य समजले जाते पण त्यांच्यामुळेच पक्ष वाढला आहे, असे खडसे यांनी सुनावले.

भाजपवर तोफा डागताना  ते म्हणाले की,भाजपमध्ये वेगळे आहे असे शिकवले जाते. निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळले पाहिजे. बेलगंगा कारखान्याचा वापर निवडणुकीसाठी करण्यात आला. कारखाना सुरू करू असे सांगितले. प्रत्यक्षात कारखाना सुरू झालाच नाही. खडसे यांनी स्थानिक विषयांच्या निमित्ताने आपल्याच पक्षातील सहकार्यांना झोडपून काढल्याची चर्चा आहे. खडसे पक्षांतर करणार का या चर्चेला नव्याने जोर चढला आहे.

Previous articleमहागठबंधनमध्ये स्थान नाकारल्याने मनसेचे एकला चलो ?
Next articleजात पडताळणी समिती रद्द केलेली नाही : मुख्यमंत्री